Manoj Jarange Patil : ‘टिकल्या, बुचड्या, हेंद्र्या…’, मराठा आरक्षणाची खिल्ली उडवणाऱ्या कालिचरण महाराजांची नक्कल करत पलटवार
मनोज जरांगे पाटील हा हिंदुत्व तोडण्यासाठी निघालेला राक्षस आहे. लाखोंच्या संख्येने मुंबईत मोर्चा काढला, ते खातील काय? टॉटलेटला जातील कुठे टेन्शन होतं का? असं कालीचरण महाराज यांनी वक्तव्य करून मराठा मोर्चाची खिल्लीच उडवली आहे.
मनोज जरांगे पाटील म्हणजे हिंदुत्व तोडण्यासाठी निघालेले राक्षस, अशा शब्दात कालिचरण महाराज यांनी टीका केली होती. यावर मनोज जरांगे पाटलांनी पलटवार केलाय. यावर मनोज जरांगेंनी प्रतिक्रिया देताना म्हटले, बाबाला काही गरज नव्हती. आरक्षण आणि बाबांचा काय संबंध येतो. या बाबाने बरंच सांगितलं. हे बाबाचा विषय नाहीच. बाबांनी आम्हाला वारकरी संप्रदायाचे संस्कार शिकवले पाहिजे, एकजूट राहण्यास शिकवलं पाहिजे. हे त्यांचं काम आहे. आरक्षण काय हे शिकवण त्यांचं काम नाही. हा विचित्र प्राणी आहे. तू का बाबा आहे का हेंद्र्या? तुम्ही आमच्यावर संस्कार केले पाहिजे. माझ्या आई बहिणीवर हल्ला झाला होता तेव्हा तू कुठे गेला होता? माझ्या पोऱ्यांनी हत्या केल्यात, ते नव्हते का हिंदू? हा टिकल्या, गंध लावतो, नथ घालतो, असं म्हणत मनोज जरांगेंनी प्रत्युत्तर दिलं आहे. पुढे ते असेही म्हणाले, हिंदू धर्मावर ज्यावेळी संकट येतं. तेव्हा आम्ही समोर येतो. तुला मी कधी बोललो नाही. तू वर आणि खाली वेगळा दिसतो. तुला कधी मी बोललो नाही. बाबा तुला आमचं दुःख कळायचं नाही. तुम्ही पाकिटं घेऊन किर्तनं करता, तुम्ही आम्हाला हिंदुत्व शिकवू नका. गरिबांच्या घरात जाऊन बस आणि आरक्षण कशाला लागतं ते विचार, तू सुपारी घेतली असेल, असं म्हणत मनोज जरांगें पाटील यांनी हल्लाबोल केला.