मराठा आणि कुणबी हे एकच की वेगवेगळे? नारायण राणे यानंतर रामदास कदम यांची उडी
tv9 marathi Special report | नारायण राणेंनंतर आता रामदास कदमांनी सरसकट कुणबी प्रमाणपत्र घेण्यास विरोध केलाय. मात्र ज्यांना हवं त्यांनी घ्यावं, असं उत्तर मनोज जरांगे पाटील यांनी दिलंय. सोशल मीडियात टीका सुरु झाल्यानंतर नितेश राणेंनी काय केली सारवासारव?
मुंबई, २२ ऑक्टोबर २०२३ | मराठा आणि कुणबी मराठा हे एकच आहेत की वेगवेगळे, या वादात आता नारायण राणेंनंतर शिंदे गटाचे नेते रामदास कदमांनी उडी घेतली आहे. तर दुसरीकडे राणेंच्या विधानानंतर सोशल मीडियात अनेक ऐतिहासिक दाखल्यांचे पोस्टही व्हायरल होत आहेत. एकीकडे सरकारनं जरांगे पाटलांना आश्वासन दिलंय आणि दुसरीकडे सत्ताधारी नेते जरांगे पाटलांच्या मागण्यांना चूक ठऱवतायत. नारायण राणेंनंतर आता रामदास कदमांनी सरसकट कुणबी प्रमाणपत्र घेण्यास विरोध केलाय. मात्र ज्यांना हवं त्यांनी घ्यावं, ज्यांना नको त्यांनी घेऊ नये, असं उत्तर जरांगे पाटलांनी दिलंय. तर दुसरीकडे 96 कुळी मराठा आणि कुणबी मराठा वेगळे असून एकही ९६ कुळी मराठा कुणबी सर्फिफिटेक घेणार नसल्याचा दावा राणेंनी केला. त्यावरुन सोशल मीडियात टीका सुरु झाल्यानंतर राणे असं म्हणालेच नसल्याची सारवासारव नितेश राणेंनी केलीय.

'तुम्हाला ट्रम्पविषयी प्रश्न विचारणार का?',दमानियांचा पंकजाताईंना सवाल

'राज्यातून तुला उद्धवस्त करणार', शिवसेनेच्या नेत्याचं ठाकरेंना चॅलेंज

कराडच मास्टरमाईंड, अशी झाली सरपंचाची हत्या, आरोपपत्रातील AटूZ घटनाक्रम

सुप्रिया सुळेंचा थेट निशाणा, महाराष्ट्राची बदनामी या दोन लोकांमुळेच...
