कोकणातला एकजण भिताडाकडे बघतोय, जरांगेंच्या रॅलीत राणे टार्गेटवर, अप्रत्यक्ष डागलं टीकास्त्र
गेल्या काही दिवसांपूर्वी नारायण राणे यांनी मराठवाड्याची घोषणा करत मनोज जरांगे पाटील यांना इशारा दिला. गणपतीनंतर मराठवाड्यात जाणार, बघू मनोज जरांगे पाटील काय करतो, असा इशारच माजी मंत्री नारायण राणे यांनी दिला होता. यावर मनोज जरांगे पाटलांनी पलटवार केलाय.
कोकणातला एकजण सध्या भिताडाकडे बघतोय, चांगला माणूस होता पण त्याला काय झालं काय माहिती? असा खोचक सवाल करत मनोज जरांगे पाटील यांनी भाजप नेते माजी मंत्री नारायण राणेंवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. मनोज जरांगे पाटील म्हणाले, माझ्या नादी लागल्यावर कठीण होतं. मला एक नाही कळालं… तुम्ही मराठवाड्यात येऊ नका, तुम्ही जर मराठवाड्यात आलात तर मी तुम्हाला बघून घेईन, असा मी कधी म्हणालो नाही किंवा तसा इशारा तुम्हाला दिला नाही तर मग तुम्ही आम्हाला का डिवचता? असा सवाल देखील मनोज जरांगे पाटील यांनी नारायण राणे यांना केला आहे. मी माझ्या समाजासाठीचा लढा इमानदारीने लढत असलो तर तुम्हाला अडचण काय? मी दादा म्हणतो..मोठ्यांचा मी सन्मान करतो… पण जर पुन्हा जर बोललात यानंतर तर मग धुलाई, असे म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी नारायण राणे यांना खोचक टोला लगावला आहे. बघा काय म्हणाले मनोज जरांगे पाटील?