भंगार नेता, एवढं प्रेम तर फडणवीसांसोबत लग्न कर…भाजप नेत्यावर टीका करताना जरांगेंची जीभ घसरली
'हा कोण बांडगुळ आता? माझ्या नादाला लागू नको, तू किती पैसेवाला आणि किती करप्ट आहे. तू जात विकून घर मोठं करणारी औलाद आहेस. मी तुला काय म्हटलंय का? तू देवेंद्र फडणवीस यांचं पाय चाट नाहीतर काही कर, आमच्या नादी लागू नकोस. नाहीतर...', मनोज जरांहे पाटील यांची कुणावर जहरी टीका
मनोज जरांगे पाटील यांनी भाजप नेते आमदार प्रसाद लाड यांच्यावर टीका केली. प्रसाद लाड यांच्यावर बोलताना मनोज जरांगे पाटील यांची जीभ घसरल्याचे पाहायला मिळाले. ‘हा कोण बांडगुळ आता? माझ्या नादाला लागू नको, तू किती पैसेवाला आणि किती करप्ट आहे. तू जात विकून घर मोठं करणारी औलाद आहेस. मी तुला काय म्हटलंय का? तू देवेंद्र फडणवीस यांचं पाय चाट नाहीतर काही कर, आमच्या नादी लागू नकोस. तुम्ही मोठे लोक आमच्या जातीसाठी भूषण होता, आता तुम्ही नीच निघाला’, असं जरांगे पाटील म्हणाले तर तू भंगार नेता… तुला लई प्रेम असेल तर देवेंद्र फडणवीसांसोबत लग्न कर, अशा शेलक्या शब्दात मनोज जरांगेंनी प्रसाद लाड यांच्यावर टीका केली. मनोज जरांगे पाटील यांना डीडी म्हणजे देवेंद्र द्वेषाचा रोग झाल्याची टीका भाजप आमदार प्रसाद लाड यांनी जरांगे पाटील यांच्यावर केली होती. याला प्रत्युत्तर देताना मनोज जरांगे पाटील यांनी प्रसाद लाड यांच्यावर सडकून हल्लाबोल केलाय.