ते सुपारी घेऊन… मनोज जरांगे पाटील यांचं राज ठाकरे यांना जोरदार प्रत्युत्तर
विजयोत्सव साजरा झाला पण मनोज जरांगे पाटील यांना कोणता विजय मिळाला? असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जरांगे पाटील यांना केला. तर आनंद व्यक्त करत होतात मग पुन्हा उपोषण कशासाठी? असा सवालही त्यांनी जरांगेंना केलाय. यावर मनोज जरांगे पाटील यांनी प्रत्युत्तर दिलंय
जालना, २ फेब्रुवारी, २०२४ : सगळ्या मागण्या मान्य झाल्यात पण आरक्षणाची मागणी मान्य झाली नाही. विजयोत्सव साजरा झाला पण मनोज जरांगे पाटील यांना कोणता विजय मिळाला? असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जरांगे पाटील यांना केला. तर आनंद व्यक्त करत होतात मग पुन्हा उपोषण कशासाठी? असा सवालही त्यांनी जरांगेंना केलाय. दरम्यान, राज ठाकरे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर मनोज जरांगे पाटील यांनी राज ठाकरेंना जोरदार प्रत्युत्तर दिलंय. आरक्षण मिळाल्याशिवाय आम्ही माघारी आलो का? असा प्रतिसवाल मनोज जरांगे पाटील यांनी करत राज ठाकरे यांना जोरदार प्रत्युत्तर दिलंय. तर सध्या राज ठाकरे कुणाची तरी सुपारी घेऊन बोलत असल्याचा घणाघातही मनोज जरांगे पाटील यांनी केला. बघा नेमकं काय म्हणाले मनोज जरांगे पाटील…?
Published on: Feb 02, 2024 06:04 PM
Latest Videos