Manoj Jarange : '...तर यांचं जीनं मुश्किल करेन', जरांगेंचा पाण्याच्या टाकीवर चढलेल्या धनंजय देशमुखांना थेट फोन अन्...

Manoj Jarange : ‘…तर यांचं जीनं मुश्किल करेन’, जरांगेंचा पाण्याच्या टाकीवर चढलेल्या धनंजय देशमुखांना थेट फोन अन्…

| Updated on: Jan 13, 2025 | 12:58 PM

मस्साजोगमधील गावकऱ्यांनी आज पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केलं. यामध्ये सरपंच संतोष देशमुख यांचा भाऊ धनंजय देशमुख देखील सहभागी होती. यावेळी त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला.

“तुम्हाला काय झालं, तर मी यांचं जीनं मुश्किल करेन. तुम्ही खाली या, तुमची कुटुंबाला गरज आहे. आपल्याला संतोष भय्याला न्याय द्यायचा आहे. माझा समाज तुमच्या पाठिशी आहे. आत्महत्या करायची नाही, खाली या” असे म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी सरपंच संतोष देशमुख यांच्या भावाला धनंजय देशमुख यांना विनंती केली. मस्साजोगमधील गावकऱ्यांनी आज पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केलं. यामध्ये सरपंच संतोष देशमुख यांचा भाऊ धनंजय देशमुख देखील सहभागी होती. यावेळी त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. यानंतर पाण्याच्या टाकीवर चढलेल्या धनंजय देशमुख यांना खालून फोन करून मनोज जरांगे पाटील यांनी त्यांची समजूत घातली पण ते खाली उतरले नाहीत. दरम्यान, संतोष देशमुख हत्या प्रकणात मास्टरमाईंड असल्याचा आरोप करण्यात येत असलेल्या वाल्मिक कराडवर मोक्का लावावा अशी मागणी आक्रमक ग्रामस्थांकडून केली जात आहे. या मागणीसाठी मस्साजोगच्या ग्रामस्थांनी आक्रमक पावित्रा घेतला आहे. मस्साजोगमधील ग्रामस्थांकडून सकाळपासूनच पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केले जात आहे.

Published on: Jan 13, 2025 12:56 PM