‘मीडिया दूर गेला की फडणवीसांचे आमदार मला भेटतात अन्..’, मनोज जरांगे नेमकं काय म्हणाले?
देवेंद्र फडणवीस यांना विरोधक आणि शत्रू मानलं नाही असं म्हणत मराठ्यांचा द्वेष करण्याची फडणवीसांची पद्धत चांगली नाही, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले. यावेळी माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले, मीडियावाले गेले की फडणवीसांचे आमदार माझ्याकडे येतात आणि...
मीडिया दूर गेला की देवेंद्र फडणवीस यांचे आमदार मला भेटतात, असं वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी केलं तर देवेंद्र फडणवीस किती द्वेष करतात हे त्यांचेच आमदार सांगतात असेही मनोज जरांगे पाटील म्हणाले. दरम्यान, यावेळी त्यांनी मागण्या मान्य केल्या नाहीतर राजकीय बोलणारच असा इशारा दिला. माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले, ‘मीडियावाले गेले की, फडणवीसांच्या आमदारांचा नंबर असतो. रात्रभर झोपू देत नाही ते… देवेंद्र फडणवीस यांच्या वागण्याची जी पद्धत आणि जो द्वेष आहे तो त्यांच्या मुळावर आलाय. भाजपमध्ये असणारा मराठा देखील खूश नाहीये. त्यांचे शब्द, मराठ्यांना फक्त टार्गेट करणं.. त्यांना हिणवल्यासारखं करणं, मराठ्यांना वेळ न देणं. शेतकऱ्यांचे ऐकून घ्यायला वेळ नाही. त्यामुळे रोष वाढलाय आणि त्यांचे माजी आमदार वैतागलेत’, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.