Manoj Jarange Patil : ‘धनंजय मुंडेंचे चिल्लर चाळे अन्…’, बीड प्रकरणी पैठणच्या आक्रोश मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
बीड जिल्ह्यातील केज तालुक्यामधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येला आज महिना उलटला तरी काही आरोपी मोकाटच आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणानंतर राज्यातील आणि राजकीय वर्तुळातील वातावरण चांगलंच ढवळून निघालं आहे. दरम्यान सरपंच संतोष देशमुख यांची हत्या आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी छत्रपती संभाजीनगरच्या पैठणमध्ये आज मूक मोर्चा काढण्यात आला. […]
बीड जिल्ह्यातील केज तालुक्यामधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येला आज महिना उलटला तरी काही आरोपी मोकाटच आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणानंतर राज्यातील आणि राजकीय वर्तुळातील वातावरण चांगलंच ढवळून निघालं आहे. दरम्यान सरपंच संतोष देशमुख यांची हत्या आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी छत्रपती संभाजीनगरच्या पैठणमध्ये आज मूक मोर्चा काढण्यात आला. पैठणमध्येही सुरू असलेल्या या विराट मोर्चामध्ये सरपंच संतोष देशमुख यांचा भाऊ, त्यांची मुलगी, मुलगा यांच्यासह हजारोंच्या संख्येने लोक सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले. यासह या मोर्चात देशमुख यांच्या हत्याप्रकरणावरून आरोपींना पकडण्याची मागणी करणारे भाजप आमदार सुरेश धस आणि मनोज जरांगे सहभागी झाले होते. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना मनोज जरांगे म्हणाले, ‘संतोष भेय्याला न्याय मिळाला पाहिजे. त्यासाठी प्रमुख भूमिकेत आम्ही राहणार आहोत. धनंजय मुंडे यांनी काय करावे आणि काय करू नये हा त्यांचा प्रश्न आहे. कारण ते ओबीसी नेत्यांना आणि त्यांच्या लाभार्थी टोळीला उठवायला लागलेत. त्यांना एक कळत नाही, आपल्या जिल्ह्यात एका व्यक्तीची क्रूर पद्धतीने हत्या झाली. मी धनंजय मुंडे यांचं २५ दिवस नाव घेतलं नाही.’, असे म्हणत जरांगे पाटील यांनी मुंडेंवर हल्लाबोल केला.