छगन भुजबळ यांचा राजीनामा अन् राजकीय घमासान, मनोज जरांगे पाटलांचा हल्लाबोल

छगन भुजबळ यांचा राजीनामा अन् राजकीय घमासान, मनोज जरांगे पाटलांचा हल्लाबोल

| Updated on: Feb 05, 2024 | 12:47 PM

मंत्री छगन भुजबळ यांनी केलेल्या राजीनाम्याच्या गौप्यस्फोटानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. राज्य सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात अधिसूचना काढली. या अधिसूचनेला छगन भुजबळ यांच्यासह अनेक ओबीसी नेत्यांनी विरोध दर्शविला. त्यामुळे सत्ताधारी पक्षातील काही नेत्यांनी भुजबळ यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

मुंबई, ५ फेब्रुवारी २०२४ : मंत्री छगन भुजबळ यांनी केलेल्या राजीनाम्याच्या गौप्यस्फोटानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. तर भुजबळ यांनी दिलेला राजीनामा म्हणजे नाटक असल्याचे म्हटले तर मनोज जरांगे पाटील यांनी देखील भुजबळांना त्यांच्या राजीनाम्यावरून लक्ष्य केलंय. मराठा आरक्षणावरून सुरू झालेला राजकीय वाद थांबायचं काही नाव घेत नाहीये. राज्य सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात अधिसूचना काढली. या अधिसूचनेला छगन भुजबळ यांच्यासह अनेक ओबीसी नेत्यांनी विरोध दर्शविला. त्यामुळे सत्ताधारी पक्षातील काही नेत्यांनी भुजबळ यांच्या राजीनाम्याची मागणी केली. त्यानंतर अहमदनगरमध्ये शनिवारी झालेल्या ओबीसी एल्गार मेळाव्यातून छगन भुजबळ यांनी मोठा गैप्यस्फोट केला. तर अडीच महिन्यांनी राजीनामा दिल्याचे जाहीरपणे का सांगितले याचं कारणही छगन भुजबळ यांनी नुकतच सांगितले. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट…

Published on: Feb 05, 2024 12:47 PM