वार-पलटवार सुरूच, काही दिवसांनी भुजबळ भजी, जिलेबीचे कागद खाणार, जरांगे यांनी डिवचलं

वार-पलटवार सुरूच, काही दिवसांनी भुजबळ भजी, जिलेबीचे कागद खाणार, जरांगे यांनी डिवचलं

| Updated on: Dec 25, 2023 | 5:06 PM

मंत्री छगन भुजबळ काही दिवसांनी भजी, जिलेबीचे कागद खाणार, असं म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर सडकून टीका केली आहे. तर माझी छाती ६ इंचाची असो किंवा २ इंचाची त्याला काय करायचं? असं वक्तव्य करत मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांना खोचक सवाल

मुंबई, २५ डिसेंबर २०२३ : मंत्री छगन भुजबळ काही दिवसांनी भजी, जिलेबीचे कागद खाणार, असं म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर सडकून टीका केली आहे. तर माझी छाती ६ इंचाची असो किंवा २ इंचाची त्याला काय करायचं, असं वक्तव्य करत मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांना खोचक सवाल केला आहे. ‘२० जानेवारीपर्यंत शांत बसतील, एकतर ते हॉस्पिटलमध्ये असतील नाहीतर बाहेर राहतात. असं असलं तरी ते छातीवर हात ठोकून गर्जना मात्र मोठ्या मोठ्या करतात. एकतर १२ इंचाची छाती ठोकून काय गडबड होऊ शकते. तब्येतीला त्यांनी सांभाळावं’, असे खोचकपणे भुजबळांनी म्हणत त्यांच्यावर निशाणा साधलाय तर माझी छाती ६ इंचाची असो किंवा २ इंचाची तुला काय करायचं तुझी १०० इंचाची आहे तू काय केलं? कांदे खाल्ले असं म्हणत जरांगेंनी पलटवार केलाय.

Published on: Dec 25, 2023 05:06 PM