Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण-भाऊ योजनेनंतर आता ‘लाडकी मेव्हणी’ची तयारी…जरांगेंकडून सरकारवर टीकेचा भडीमार
सरकारच्या या योजनेवरून विरोधकांनी सरकारला चांगलंच घेरलं... योजना फक्त महिलांसाठीच का... असा सवाल विरोधकांनी केला. यानंतर राज्य सरकारने तरूण मुलांसाठी लाडका भाऊ योजनेची घोषणा केली. दरम्यान, अशा योजनांवरून विरोधकांसह आता मनोज जरांगे पाटील यांनीही सरकारला टार्गेट केल्याचे पाहायला मिळतंय.
राज्य सरकारने महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली. यानंतर राज्यभरात महिलांचा जो काही मोठा प्रतिसाद मिळाला. त्यानंतर या योजनेचा लाभार्थी होण्यासाठी अर्ज भरण्याची तारीख सरकारकडून वाढवण्यात आली. इतकंच नाहीतर जास्तीत जास्त महिलांना लाभ मिळावा म्हणून सरकारने यातील अटी शिथिल केल्याचे पाहायला मिळाले. यानंतर सरकारच्या या योजनेवरून विरोधकांनी सरकारला चांगलंच घेरलं… योजना फक्त महिलांसाठीच का… असा सवाल विरोधकांनी केला. यानंतर राज्य सरकारने तरूण मुलांसाठी लाडका भाऊ योजनेची घोषणा केली. दरम्यान, अशा योजनांवरून विरोधकांसह आता मनोज जरांगे पाटील यांनीही सरकारला टार्गेट करत जोरदार हल्लाबोल केल्याचे पाहायला मिळाले. लाडकी बहीण, लाडका भाऊ आणि आता लाडकी मेव्हणी योजना पण सरकार आणले, असा खोचक टोला मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला लगावला. बघा काय म्हणाले जरांगे पाटील…?