मनोज जरांगे पाटलांच्या समर्थकावर प्राणघातक हल्ला, 4 अज्ञात इसम आले अन्…
अज्ञात चार लोकांनी मनोज जरांगे पाटील यांचे समर्थक असलेले अमोल खुणे यांच्यावर प्राणघातक हल्ला केला आहे. या प्राणघातक हल्ल्यांमध्ये अमोल खुणे यांच्या डोक्याला जबर दुखापत झाल्याची माहिती मिळत आहे. त्यांच्यावर बीड जिल्ह्यातील गेवराई येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू
मनोज जरांगे पाटील यांचे समर्थक असलेले अमोल खुणे यांच्यावर मोठा हल्ला करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. अज्ञात चार लोकांनी मनोज जरांगे पाटील यांचे समर्थक असलेले अमोल खुणे यांच्यावर प्राणघातक हल्ला केला आहे. या प्राणघातक हल्ल्यांमध्ये अमोल खुणे यांच्या डोक्याला जबर दुखापत झाल्याची माहिती मिळत आहे. त्यांच्यावर बीड जिल्ह्यातील गेवराई येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जरांगे यांचे समर्थक असलेले अमोल खुणे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी दगड फेकून हल्ला केला. या हल्लामध्ये अमोल खुणे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्या डोक्याला जबर दुखापत झाली आहे. सोमवारी रात्री ही घटना घडली. खुणे यांच्यावर हल्ला केल्यानंतर आरोपी तेथून फरार झाले आहेत. कोपर्डी बलात्कारातील आरोपीवर हल्ला केल्याप्रकरणी मनोज जरांगे पाटील यांचे समर्थक असलेले अमोल खुणे हे दोन वर्ष जेलमध्ये होते. जेल मधून बाहेर आल्यावर अमोल खुणे हे मनोज जारांगे पाटील यांच्यासोबत काम करत आहेत.