‘कसा दम काढायचा? वड्याची भाजीचा मला वास आला अन्..’, जरांगे असं काय म्हणाले की सगळेच हसायला लागले
आता सलाईन लागलीच आहे, तर आता उपयोग नाही. सलाईन ही जेवणासारखीच आहे. त्यामुळे आता उपोषणाची मानसिकता राहिली नाही आणि उपोषणाला आता अर्थ नाही. सलाईन लावल्यानतंर त्यांनी हलक्याफुलक्या गप्पाही उपोषणस्थळावर असणाऱ्यांसोबत मारल्या.
सरकारला पुन्हा एक महिन्याच्या वेळ देत मनोज जरांगे पाटील यांनी आज आपलं उपोषण स्थगित करणार असल्याची घोषणा केली आहे. तर येत्या 13 आगस्टपर्यंत सरकारने मागण्या मान्य कराव्यात, अशी मागणीही मनोज जरांगे पाटील यांनी केली. जरांगे पाटील पुढे म्हणाले, की मला हातपाय दाबून सलाईन लावली. आता सलाईन लागलीच आहे, तर आता उपयोग नाही. सलाईन ही जेवणासारखीच आहे. त्यामुळे आता उपोषणाची मानसिकता राहिली नाही आणि उपोषणाला आता अर्थ नाही. सलाईन लावल्यानतंर त्यांनी हलक्याफुलक्या गप्पाही उपोषणस्थळावर असणाऱ्यांसोबत मारल्या. ‘सलाईन लावून काही होणार नाही. जेवढ्या सलाईन लावतो तेवढी भूक लागते. जितक्या सलाईन लावल्या तेवढी जास्त भूक लागते. नसलेल्या भाजीचा वास येतो. तिकडे कोणी वड्याची भाजी केली… आणि मला वास आला तेव्हाच मला मरणाची भूक लागली.’ असं म्हटल्यानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. उपोषण करणं सोपं नाहीये. मी उपोषणाला बसलोय आणि माझ्या पुढेच केळं खातायंत लोकं.. कसा दम काढायचा… ? असा खोचक सवालही जरांगेंनी केला.