Manoj Jarange Patil Threat :’10 मिनिटांत पाटलांचा कार्यक्रम…’, जरांगेंकडून इच्छुकांच्या भेटीगाठी सुरू असताना जीवे मारण्याची धमकी
विधानसभा निवडणुकीत उमेदवार देण्याची घोषणा केल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी इच्छुकांच्या भेटी-गाठी सुरू केल्यात. आता गनिमी काव्याने लढणार असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले. तर सोशल मीडियावर धमकी देणाऱ्या मेसेज नंतर त्यांच्या सुरक्षेतही वाढ करण्यात आली आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या अंतरवाली सराटीमध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये इच्छुकांच्या मुलाखती घेणं सुरू आहे. तर दुसरीकडे मनोज जरांगे पाटलांना युट्यूब चॅनलच्या एका हँडलच्या कमेंट बॉक्समध्ये धमकी देणार मेसेज पाठवण्यात आला आहे. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. मनोज जरांगे पाटील यांना आलेल्या धमकीत असं म्हटलंय की, आमचा एक मेंबर इच्छुक आहे. तो मध्ये जाऊन मनोज जरांगे पाटलांचा गेम करणार आहे. लक्ष देऊन बघा सगळे आता १० मिनिटामध्ये पाटलाचा कार्यक्रम…. या धमकीनंतर मनोज जरांगे पाटलांची पोलीस सुरक्षा वाढवली असून मनोज जरांगे पाटलांना भेटण्यासाठी येणाऱ्यांची तपासणी करण्यात येत आहे. उमेदवार देण्याची घोषणा केल्यानंतर आता मनोज जरांगे पाटलांनी उमेदवार निवडण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. किती ठिकाणी लढणार हे सांगणार नसून महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या याद्या आल्यानंतरच उमेदवारांची घोषणा करणार असं मनोज जरांगे पाटील म्हणालेत. मराठवाड्यातील सर्व ४८ मतदारसंघात उमेदवार न देता मराठ्यांची निर्णायक संख्या असलेल्या ठिकाणी उमेदवार देऊ शकतात. मनोज जरांगे पाटील किती आणि कोणाविरोधात उमेदवार देऊ शकतात? बघा स्पेशल रिपोर्ट