मनोज जरांगे पाटील MIM शी युती करणार? इम्तियाज जलील नेमकं काय म्हणाले?

मनोज जरांगे पाटील MIM शी युती करणार? इम्तियाज जलील नेमकं काय म्हणाले?

| Updated on: Jul 15, 2024 | 5:15 PM

विधानपरिषद निवडणुकीत एमआयएची मतं महायुतीला पडली असा दावा केला जात असताना विधानपरिषदेत महाराष्ट्रात मुस्लीम समजाचा एकही खासदार नाही, असे सांगत असताना मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत एमआयएमची युती होणार का? यावर बोलताना जलील म्हणाले...

नुकत्याच विधानपरिषदेच्या निवडणुका झाल्यात. या निवडणुकीत एमआयएची मतं महायुतीला पडली असा दावा केला जात आहे. यावरून ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी चांगलीच आगपाखड केली होती. यावरच इम्तियाज जलील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘संजय राऊत काय बोलतात यावर मी उत्तर देणार नाही. ज्यावेळी त्यांच्याकडून काही चूक होते. तेव्हा दुसऱ्याला बोट दाखवायचे. पण मी कोणाला मतदान करायचं आहे माझा अधिकार आहे’, असे जलील यांनी स्पष्ट म्हटले. तर ३० वर्षानंतर आशी परीस्थिती आहे की, विधानपरिषदेत महाराष्ट्रात मुस्लीम समजाचा एकही खासदार नाही, असे सांगत असताना मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत एमआयएमची युती होणार का? यावर बोलताना जलील म्हणाले, मनोज जरांगे हे निवडणुकीची काय रणनीती ठरवणार आहेत? जर काही प्रस्ताव आला तर आम्ही सकारात्मक आहोत. आम्ही स्वतः कुठे जाणार नाही परंतु कोणी आले तर सकारात्मक आहोत, असेही त्यांनी म्हटले.

Published on: Jul 15, 2024 05:12 PM