Maratha Reservation : शिंदे सरकारच्या शिष्टमंडळाशी जरांगे पाटील यांची चर्चा निष्फळ, पुढील दिशा काय?
शिंदे सरकारच्या शिष्टमंडळाने मनोज जरांगे पाटील यांच्याशी काल मराठा आरक्षणासंदर्भात चर्चा केली. मात्र ही चर्चा निष्फळ ठरल्याचे पाहायला मिळाले. कारण काल होत असलेल्या चर्चेत मनोज जरांगे पाटील हे सोयरे या शब्दावरूच अडून राहिले आणि ही सरकारसोबतची चर्चा निष्फळ ठरली
मुंबई, २२ डिसेंबर २०२३ : शिंदे सरकारच्या शिष्टमंडळाने मनोज जरांगे पाटील यांच्याशी काल मराठा आरक्षणासंदर्भात चर्चा केली. मात्र ही चर्चा निष्फळ ठरल्याचे पाहायला मिळाले. कारण काल होत असलेल्या चर्चेत मनोज जरांगे पाटील हे सोयरे या शब्दावरूच अडून राहिले आणि ही सरकारसोबतची चर्चा निष्फळ ठरली. दरम्यान, सरकारच्या शिष्टमंडळाशी झालेल्या चर्चेनंतर मनोज जरांगे पाटील हे परभणी आणि लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. मनोज जरांगेंच्या मराठा संवाद यात्रेचा हा पाचवा टप्पा आहे. आज मनोज जरांगे पाटील यांची परभणी येथे सेलू, सोनपेठ आणि गंगाखेडमध्येही सभा होणार आहे. तर या सभांमधून मनोज जरांगे पाटील नेमकी कोणती भूमिका मांडणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. अशातच मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिलेल्या अल्टिमेटमला अवघे दोन दिवस उरले असल्याने सरकारच्या भूमिकेकडेही साऱ्यांचे लक्ष लागले आहे.