पुन्हा मरायला तयार… मतदानाचा हक्क बजावण्यासाठी निघालेले मनोज जरांगे पाटील काय म्हणाले?
जो उमेदवार आपल्या सगे-सोयऱ्याच्या बाजूने आहे, त्याला मतदान करा, ज्याला पाडायचं त्याला पाडा, मी सांगणार नाही कुणाला निवडून आणायचे. पाडण्यातही खूप मोठा विजय आहे. मराठ्यांनी १०० टक्के मतदान करा, असे म्हणत जरांगे पाटील यांनी मतदारांना केलं आवाहन
छत्रपती संभाजीनगर येथून परभणी लोकसभा मतदारसंघातील शहागड येथील गोरी गांधारी मतदार केंद्राकडे दाखल होत ते आपला मतदानाचा हक्क मनोज जरांगे पाटील यांनी बजावला. यावेळी ते म्हणाले, मतदान हा लोकशाहीचा मोठा उत्सव आहे. आपण सर्वांनी आपला मतदानाचा हक्क बाजवला पाहिजे. जो उमेदवार आपल्या सगे-सोयऱ्याच्या बाजूने आहे, त्याला मतदान करा, असे मनोज जरांगे पाटील यांनी आवाहन केले. ज्याला पाडायचं त्याला पाडा, मी सांगणार नाही कुणाला निवडून आणायचे. पाडण्यातही खूप मोठा विजय आहे. मराठ्यांनी १०० टक्के मतदान करा, असेही जरांगे पाटील यांनी म्हटले. लोकसभेला आम्ही कुणालाही पाठिंबा दिला नाही. मात्र मराठ्यांना बरोबर माहिती आहे, कोणाला मतदान करायचे आहे. पुढे जरांगे पाटील असेही म्हणाले की, माझ्या समाजाचं कल्याण होईल असं पाऊल मी उचलणार आहे. ६ जूनपर्यंतचा सरकारला वेळ दिलाय, त्यापूर्वी ४ जूनला मी आमरण उपोषण करतोय. पुन्हा मी मरायला तयार आहे आणि ६ जूनपर्यंत जर नाही निर्णय घेतला तर विधानसभेसाठी मी स्वतः मैदानात असल्याचे म्हणत जरांगे पाटलांनी आव्हानच दिल्याचे पाहायला मिळत आहे.