पण मराठे काहीही करू शकतात... आरक्षणावरील देवेंद्र फडणवीसांच्या 'त्या' विधानावरून मनोज जरांगेंचा इशारा

पण मराठे काहीही करू शकतात… आरक्षणावरील देवेंद्र फडणवीसांच्या ‘त्या’ विधानावरून मनोज जरांगेंचा इशारा

| Updated on: Feb 16, 2024 | 6:24 PM

आरक्षण दिलं किंवा नाही दिलं म्हणून निवडणुकीवर परिणाम नाही, असे विधान राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. तर आरक्षणावरील देवेंद्र फडणवीस यांच्या विधानावरून मनोज जरांगे पाटील यांनी काय दिला इशारा?

मुंबई, १६ फेब्रुवारी २०२४ : आरक्षण आंदोलनामुळे देशात कुठेही राजकीय परिणाम झालेला नाही. आरक्षण दिलं किंवा नाही दिलं म्हणून निवडणुकीवर परिणाम नाही, असे विधान राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. तर आरक्षणावरील देवेंद्र फडणवीस यांच्या विधानावरून मनोज जरांगे पाटील यांनी इशारा दिल्याचे पाहायला मिळाले. ‘आरक्षण दिल्याने सरकार पडतं की नाही पडत माहिती नाही तर मराठे आणि मराठा समाज काहीही करू शकतात हे मला माहिती आहे.’, असे जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. पुढे ते असेही म्हणाले की मराठा समाजाचा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास असल्याचेही त्यांनी म्हटले.

Published on: Feb 16, 2024 06:24 PM