‘जे खोटं, बोगस ते दिलं, सत्य ते दिलं नाही; पण 13 तारखेच्या आत….’, जरांगेंचा पुन्हा सरकारला इशारा
गावागावासह , तालक्या-तालुक्यासह हैदराबाद संस्थानच्या या सरकारी नोंदी आहेत. या देशात आणि राज्यात कोणाच्याही सरकारी नोंदी नाहीत, तरी त्यांना आरक्षण मिळतंय, असे म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला फटकारलं आहे. तर मराठ्यांना १३ तारखेच्या आत आरक्षण देणं हे बंधनकारक असल्याचे जरांगे म्हणाले
मराठवाड्यातला मराठा समाज हा कुणबी आहे. हैदराबाद गॅझेट सांगतंय त्या सरकारी नोंदी आहेत. त्याचं रेकॉर्ड सर्वात आधी तपासायला तातडीने सुरूवात करा. गावागावासह , तालक्या-तालुक्यासह हैदराबाद संस्थानच्या या सरकारी नोंदी आहेत. या देशात आणि राज्यात कोणाच्याही सरकारी नोंदी नाहीत, तरी त्यांना आरक्षण मिळतंय, असे म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला फटकारलं आहे. तर मराठ्यांना १३ तारखेच्या आत आरक्षण देणं हे बंधनकारक आहे, असं म्हणत जरांगे पाटलांनी सरकारला दिलेल्या अल्टिमेटमची पुन्हा आठवण करून दिली आहे. पुढे ते असेही म्हणाले, तुम्ही जे खोटं आहे, जे बोगस आहे ते दिलं, जे सत्य आहे ते दिलं नाही. त्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे, आपण सरकार म्हणून खूपच स्पष्टपणे बोलणं गरजेचं आहे, असे म्हणत जरांगेंनी सरकारलाच कडक इशारा दिला आहे. तर मराठवाड्यातला मराठा समाज कुणबी, असं कायदा सांगतो. सरकारी नोंदी कोणाला नाकारता येत नाहीत. गावागावांमध्ये कुणबी नोंदी सापडल्या आहेत, असेही मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले आहे.