मनोज जरांगे पाटील यांची पुढची रणनीती काय? अल्टिमेटमचे काहीच तास शिल्लक

मनोज जरांगे पाटील यांची पुढची रणनीती काय? अल्टिमेटमचे काहीच तास शिल्लक

| Updated on: Oct 22, 2023 | 10:24 AM

tv9 marathi Special Report | 24 ऑक्टोबरपर्यंत ओबीसी आरक्षणावर फैसला न घेतल्यास सरकारची गाठ मराठ्यांशी, मनोज जरांगे पाटील यांचा राज्य सरकारला इशारा, 25 ऑक्टोबर पासून आंदोलन कसं करायचं? लवकरच मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणाची रणनिती ठरणार आहेत, बघा रिपोर्ट

मुंबई, २२ ऑक्टोबर २०२३ | मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटलांनी 40 दिवसांचा अल्टिमेटम दिला होता. आता तो अल्टिमेटम संपण्यासाठी 3 दिवस राहिलेत. त्याआधी जरांगे पाटील आज आंदोलनाची नवी दिशा, मराठा समाजासमोर स्पष्ट करणार आहेत. दरम्यान 24 ऑक्टोबरपर्यंत ओबीसी आरक्षणावर फैसला न घेतल्यास सरकारची गाठ मराठ्यांशी आहे, असा इशाराही जरांगेंनी दिलाय. जरांगे पाटलांची मराठा आरक्षणासाठीची मुदत आता संपत आलीय. त्याआधी, रविवारी आज जरांगे पाटील आंदोलनाची पुढची दिशा ठरवणार आहेत. 25 ऑक्टोबर पासून आंदोलन कसं करायचं हे जरांगे मराठा समाजाला सांगणार आहेत. जरांगे पाटलांची मुदत आता संपत आलीय. मराठा आरक्षणावर ठोसपणे पुन्हा सरकारनं जरांगे काही सांगितलेलं नाही. पण शिंदेंचे मंत्री केसरकरांनी जरांगेंनी वेळ वाढवून द्यावी अशी मागणी केलीय.कारण आरक्षणासंदर्भात गठित केलेल्या अॅड. शिंदेंच्या समितीची सरकारला 30 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ दिलीय.

Published on: Oct 22, 2023 10:24 AM