धाराशिवमधील सभेदरम्यान मनोज जरांगे पाटील यांना आशक्तपणा; डॉक्टर म्हणाले, ५ दिवस विश्रांती न घेतल्यास…
मनोज जरांगे पाटील यांची धाराशिव जिल्ह्यातील लोहारा येथील माकणी येथे जाहीर सभा होती. या सभेदरम्यान मनोज जरांगे पाटील यांना अशक्तपणा जाणवू लागला. यावेळी मराठा कार्यकर्त्यांनी मनोज जरांगे यांची तब्येत खलवली असे लक्षात येताच डॉक्टरांना पाचारण केले. डॉक्टर सभास्थळी दाखल होताच त्यांनी मनोज जरांगे पाटील यांना व्यासपीठावरच तपासले
धाराशिव, ११ डिसेंबर २०२३ : मनोज जरांगे पाटील यांची धाराशिव जिल्ह्यातील लोहारा येथील माकणी येथे जाहीर सभा होती. या सभेदरम्यान मनोज जरांगे पाटील यांना अशक्तपणा जाणवू लागल्याची माहिती समोर येत आहे. यावेळी मराठा कार्यकर्त्यांनी मनोज जरांगे यांची तब्येत खलवली असे लक्षात येताच डॉक्टरांना पाचारण केले. डॉक्टर सभास्थळी दाखल होताच त्यांनी मनोज जरांगे पाटील यांना व्यासपीठावरच तपासले. यावेळी डॉक्टर यांनी मनोज जरांगे पाटील यांना विश्रांतीचा सल्ला दिला आहे. मनोड जरांगे पाटील यांची बीपी आणि शुगर कमी झाली आहे. मनोज जरांगे पाटील यांना खूप अशक्तपणा आला आहे. त्यामुळे सध्या यावरच मनोज जरांगे यांना उपचार दिले आहेत, असशी माहिती मनोज जरांगे पाटील यांना तपासणाऱ्या डॉक्टरांनी दिली आहे. तसंच अशक्तपणा खूप असल्याने त्यांना आवर्जून विश्रांती घेण्याचा सल्लाही दिला आहे. तर आगामी 5 दिवस विश्रांती न घेतल्यास त्यांच्या किडनीवर परिणाम होऊ शकतो, असेही त्यांनी सांगितले.