लोकसभेचा निकाल अन् त्याच दिवशी जरांगे पाटलांचं पुन्हा एकदा उपोषण
सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीचा निकाल येत्या ४ जून रोजी लागणार असून त्याच दिवशी मनोज जरांगे पाटील यांनी बेमुदत उपोषणाची हाक दिली आहे. 4 जून रोजी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटीत मराठा आंदोलन सुरु होईल, अशी माहिती मनोज जरांगे पाटील यांनी दिली आहे.
देशासह राज्यात सध्या लोकसभा निवडणुकीची रणाधुमाळी सुरू असताना मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा एल्गार पुकारला आहे. सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीचा निकाल येत्या ४ जून रोजी लागणार असून त्याच दिवशी मनोज जरांगे पाटील यांनी बेमुदत उपोषणाची हाक दिली आहे. 4 जून रोजी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटीत मराठा आंदोलन सुरु होईल, अशी माहिती मनोज जरांगे पाटील यांनी दिली तर उपोषण स्थळी राज्यातील गरजवंत समाज एकत्रित जमणार आहे. गरीब समाजासाठी माझा लढा सुरू असून या लढ्यात सर्वच समाज एकत्रित येणार आहे, असे जरांगे पाटील यांनी सांगितले. माझ्या आंदोलना मागे कोणीही नाही. फुस लावण्याचा तर प्रकार लांबच राहिला. काहीही कारणं जोडू नका. इथ मराठा एक झालेला आहे. आंदोलन हे सरकारच्या फायद्याचे होत असतात. मात्र माझे आंदोलन समाजासाठी असल्याचे जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.