देवेंद्र फडणवीस यांची जिरवणारच, अंतरवालीत जरांगेंचा हायहोल्टेज ड्रामा; दिला आरपार लढाईचा इशारा

देवेंद्र फडणवीस यांची जिरवणारच, अंतरवालीत जरांगेंचा हायहोल्टेज ड्रामा; दिला आरपार लढाईचा इशारा

| Updated on: Aug 29, 2024 | 4:17 PM

देवेंद्र फडणवीसांनी मुद्दाम मराठा समाजाला वेठीस धरल्याचा आरोप जरांगे पाटील यांनी केला. तर यावेळी सरकारकडे 29 सप्टेंबरपर्यंत वेळ असल्याचे त्यांनी जाहीर केले. एक वर्षात माझ्या समाजाचा तोटा झाल्याचे म्हणत मनोज जरांगे पाटलांनी आता आरपारच्या लढाईचा इशारा सरकारला दिला.

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. मराठा आरक्षण आंदोलनाला आज एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर अंतरवाली सराटीमध्ये एक बैठक घेण्यात आली. पण ही बैठक संपतानाच मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा आमरण उपोषण करणार असल्याचे जाहीर केले. त्यामुळे अंतरवाली सराटीमध्ये पुन्हा एकदा हायहोल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. या बैठकीनंतर मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधत सडकून टीका केली. देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच मराठा आरक्षणाला खोडा बसला. मराठा समाजाला आरक्षण मिळू नये यासाठी ते प्रयत्न करत असल्याचा गंभीर आरोपही जरांगेंनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला. आपण समाजाला शब्द दिला आहे. कुणाचं कुटुंब उघड पडू देणार नाही. आता 29 सप्टेंबरापासून उपोषणाला बसणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. यावेळी उपोषणाने आरक्षण मिळवायचं आणि आमदारही पाडायचे असे आवाहन केले. इतकंच नाहीतर काही झाले तरी आता देवेंद्र फडणवीस यांची जिरवणारच असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.

Published on: Aug 29, 2024 04:17 PM