Maratha Reservation : मनोज जरांगे पाटील यांचं मुंबईत सर्वात मोठं आंदोलन, कसा असणार उपोषणाचा प्लॅन?
बीडच्या सभेतून बोलत असताना 20 जानेवारीला मुंबईतील आझाद मुंबईवर जरांगे पाटील आमरण उपोषण करणार असल्याचे त्यांनी जाहीर केलं. सर्वकामं आटोपून ठेवा, मुंबईत धडक द्यायची आहे म्हणज मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला सांगितला कसा असणार अंतरवाली ते मुंबई रूट प्लॅन?
मुंबई, २५ डिसेंबर २०२३ : मुंबईतलं आंदोलन सर्वात मोठं आणि शक्यतो शेवटचं आंदोलन असणार, असं म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाची पुढची दिशा सांगताना उपोषणाचा संपूर्ण प्लॅन सांगितला. बीडच्या सभेतून बोलत असताना 20 जानेवारीला मुंबईतील आझाद मुंबईवर जरांगे पाटील आमरण उपोषण करणार असल्याचे त्यांनी जाहीर केलं. सर्वकामं आटोपून ठेवा, मुंबईत धडक द्यायची आहे. मुंबईत आपल्यालाच आपली व्यवस्था करावी लागणार आहे. तर मराठा आंदोलन घेतल्याशिवाय माघारी फिरायचं नाही, असं म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा निर्धार व्यक्त केला आहे. यावेळी जालन्यातील अंतरवाली ते मुंबई कसा असणार रूट प्लॅनही मनोज जरांगे पाटील यांनी सांगितला. तर हे समजावून सांगत असताना मराठा आंदोलनासाठी आझाद मैदानावर होणारं हे देशातील सर्वांत मोठं आंदोलन असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
Published on: Dec 25, 2023 05:29 PM
Latest Videos