मनोज जरांगेंच्या विरोधात सगळा मराठा समाज उभा करायला आम्हाला वेळ लागणार नाही, कोणी दिली उघड धमकी
मनोज जरांगे पाटील यांच्यावर बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी उदयन राजे यांच्या निवडूकी संदर्भातील आरोप केल्यानंतर आता वातावरण चिघळलं आहे. आता जरांगे यांनी राऊत यांना आव्हान दिले असल्याने त्यांच्या बाजू घेत भाजपाचे लोक पुढे येत आहेत.
मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला आता प्रतिसाद मिळत नाही. त्यांनी महाविकास आघाडीची बाजू घेतल्याचे वारंवार दिसून आले आहे. त्यामुळे मराठा समाजाचा प्रतिसाद कमी कमी होत चालला आहे. मनोज जरांगे महाविकास आघाडीला पूरक काम करीत आहे. आमच्या राजेंद्र राऊत यांना आव्हान देण्याची भाषा मनोज जरांगे करीत आहेत. राजेंद्र राऊत यांच्या मागे आम्ही सर्व मराठा समाजाचे आमदार आहोत. आम्ही सर्व ताकदीने राजेंद्र राऊत यांच्या मागे आहोत असे भाजपाचे नेते प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे.मराठा समाजाचा सात बारा तुमच्या नावावर लिहीलाय का ? असेही दरेकर यांनी जरांगे पाटील यांना आव्हान दिले आहे.
Published on: Sep 07, 2024 06:12 PM
Latest Videos