Mansukh Hiren Death : शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा, अहवालात नेमकं काय?
अंबानींच्या घराबाहेर जी गाडी सापडली होती, त्या स्कॉर्पिओचे मालक मनसुख हिरेन (Mansukh Hiren) यांचा मृतदेह सापडला. त्यांच्या शवविच्छेदन अहवालात नेमकं काय, यावरुन तपास यंत्रणाना पुढील दिशा ठरवतील
मुंबई : प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या अँटिलिया निवासस्थानाजवळ स्फोटक पदार्थांसह सापडलेल्या गाडीच्या प्रकरणाचा तपास महाराष्ट्र पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाकडे (एटीएस) सोपवण्यात येत असल्याची घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधानसभेत केली. अंबानींच्या घराबाहेर जी गाडी सापडली होती, त्या स्कॉर्पिओचे मालक मनसुख हिरेन (Mansukh Hiren) यांचा मृतदेह सापडला. त्यांच्या शवविच्छेदन अहवालात नेमकं काय, यावरुन तपास यंत्रणाना पुढील दिशा ठरवतील