Mumbai | भाजपचे अनेक नेते काढणार महाराष्ट्रात ‘जन आशीर्वाद यात्रा’

| Updated on: Aug 09, 2021 | 7:44 PM

नारायण राणे, भारती पवार, कपिल पाटील, भागवत कराड या मंत्र्यांसाठी ही जन आशीर्वाद यात्रा असणार आहे.  संजय केळकर, अशोक उईके, निरंजवन डावखरे, अतुल सावे  तसेच इतर नेत्यांवर ही जबाबदारी टाकण्यात आली आहे. 

नवी दिल्ली : येत्या 16 ऑगस्टपासून महाराष्ट्रातील अनेक भागात महाराष्ट्रत केंद्रीय मंत्री आणी राज्यमंत्री यांच्या यात्रेचं नियोजन भाजपतर्फे केले जात आहे. आप आपल्या मतदार संघात न जाता इतर जिल्ह्यात या मंत्र्यांचा दौरा असणार आहे. लोकांशी संवाद साधण्यासोबतच केंद्रातील योजनांची माहितीही ते जनतेला देणार आहेत. नारायण राणे, भारती पवार, कपिल पाटील, भागवत कराड या मंत्र्यांसाठी ही जन आशीर्वाद यात्रा असणार आहे.  संजय केळकर, अशोक उईके, निरंजवन डावखरे, अतुल सावे  तसेच इतर नेत्यांवर ही जबाबदारी टाकण्यात आली आहे.