Nanded Corona | अनेकांना मास्कचा विसर, खासदार प्रताप पाटील चिखलीकरांच्या स्वागतासाठी गर्दी

Nanded Corona | अनेकांना मास्कचा विसर, खासदार प्रताप पाटील चिखलीकरांच्या स्वागतासाठी गर्दी

| Updated on: Aug 07, 2021 | 3:29 PM

संसदेत मराठा आरक्षणाचा प्रश्न मांडणाऱ्या खासदारांचे नांदेडमध्ये जोरदारपणे स्वागत झालय. संसदेच्या शून्य प्रहारामध्ये नांदेडचे खासदार प्रताप पाटील यांनी मराठा आरक्षणाचा प्रश्न उपस्थित केला होता. त्यामुळे खासदार पाटील आज नांदेडमध्ये येताच विविध मराठा संघटनांनी एकत्र येऊन त्यांचे जल्लोषात स्वागत केले.

संसदेत मराठा आरक्षणाचा प्रश्न मांडणाऱ्या खासदारांचे नांदेडमध्ये जोरदारपणे स्वागत झालय. संसदेच्या शून्य प्रहारामध्ये नांदेडचे खासदार प्रताप पाटील यांनी मराठा आरक्षणाचा प्रश्न उपस्थित केला होता. त्यामुळे खासदार पाटील आज नांदेडमध्ये येताच विविध मराठा संघटनांनी एकत्र येऊन त्यांचे जल्लोषात स्वागत केले. कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचा फज्जा उडवत हजारो कार्यकर्त्यांनी खासदारांच्या स्वागतासाठी गर्दी केली, त्यांनतर शहरात खासदारांची मिरवणूक काढत त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करण्यात आलाय. खासदारांच्या स्वागतासाठी मोटारसायकलची रैली देखील काढण्यात आली, या मोठ्या ताफयामुळे शहरात वाहतुकीचे मात्र तीनतेरा वाजले होते.