पपई आणि केळी पिकांवर ‘मर’ रोगाचा प्रादुर्भाव, कोणत्या जिल्ह्यात बळीराजा चिंतेत
VIDEO | नंदुरबार तालुक्यात मोठ्या प्रमाणात केळी आणि पपईची लागवड; मात्र मर रोगाचा प्रादुर्भाव
नंदुरबार : शहादा तालुक्यात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात केळी आणि पपईची लागवड केली आहे. लागवड झाल्यानंतर दीड महिन्यात पपई आणि केळीच्या रोपांवर मर रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. यासाठी मागळ्या औषधांची फवारणी केली त्याचबरोबर विविध द्रव्य खते याच्या चार ते पाच वेळीस दिल्याने शेतकऱ्यांचा मोठा खर्च या पिकावर झाला आहे. मात्र तीव्र तापमान व विविध आजारांमुळे या रोपांची मोठ्या प्रमाणावर मर होत असल्याचे चित्र शहादा तालुक्यात परिसरात दिसत आहे. यावर्षी पपईचे रोप १४ रुपयांपासून तर १६ रुपयांपर्यंत त्याच्याबरोबर. केळीचे रोप १५ ते १७ रुपयापर्यंत शेतकरी विकत घेऊन लागवड केली. परंतु पिकाच्या लागवडीच्या त्याचसोबत संगोपनाचा मोठा खर्च असल्याने मर रोगामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. कृषी विभागाचे अधिकाऱ्यांनी मर रोगाचे कारण शोधून त्यावर उपाययोजना सुचवाव्यात अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.