नाहीतर पुन्हा मुंबईच्या दिशेनं मोर्चा, मनोज जरांगे पाटील यांचा पुन्हा सरकारला इशारा

नाहीतर पुन्हा मुंबईच्या दिशेनं मोर्चा, मनोज जरांगे पाटील यांचा पुन्हा सरकारला इशारा

| Updated on: Jun 26, 2024 | 10:57 AM

छगन भुजबळ यांना राज्यात मराठा-ओबीसीमध्ये वाद लावून दंगली घडवायच्या आहेत, असा आरोपही मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. सरकारने दिलेल्या १३ तारखेपर्यंत गप्प रहा, खेड्यापाड्यात दंगली घडवण्याच्या नेत्यांच्या डावाला बळी पडू नका, असं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे

वेळ पडली तर पुन्हा मुंबईत मोर्चा काढू, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिला. तर छगन भुजबळ यांना राज्यात मराठा-ओबीसीमध्ये वाद लावून दंगली घडवायच्या आहेत, असा आरोपही मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. सरकारने दिलेल्या १३ तारखेपर्यंत गप्प रहा, खेड्यापाड्यात दंगली घडवण्याच्या नेत्यांच्या डावाला बळी पडू नका, असं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजासह इतर गावकऱ्यांना केलाय. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर जरांगे अंतरवाली सराटी या गावात आलेत. आम्हाला परवानगी नाकारून छगन भुजबळांच्या दबावाला बळी पडून इतरांना परवानगी दिली गेली, अशा घटनांचा तपशील देत जरांगे पाटील यांनी दंगलीच्या कटकारस्थानापासून सावध राहण्याचं आवाहन केलं. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट

Published on: Jun 26, 2024 10:57 AM