‘मंगेश साबळे याच्याकडून सदावर्ते यांच्या वाहनांची तोडफोड तरी सर्वोतोपरी मदत करणार’
VIDEO | मंगेश साबळे याने जी तोडफोड केली आणि कायदा मोडला त्याचा मी निषेध करतो. पण त्याला सर्वोतोपरी कायदेशीर मदत आम्ही करू, मराठा क्रांची मोर्चाचे समन्वयक विनोद पाटील यांनी मराठा तरूणांनी वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या गाड्यांच्या तोडफोडीवर प्रतिक्रिया दिली.
छत्रपती संभाजीनगर, २६ ऑक्टोबर २०२३ | वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या वाहनांची मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली. या हल्ल्याप्रकरणी मंगेश साबळे यांच्यासह तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावर मराठा क्रांची मोर्चाचे समन्वयक विनोद पाटील यांनी भाष्य केले आहे. मंगेश साबळे याने जी तोडफोड केली आणि कायदा मोडला त्याचा मी निषेध करतो. मंगेश साबळे हा मराठा क्रांती मोर्चातील गुणवंत आणि क्रियाशील कार्यकर्ता आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी त्याने स्वतःची गाडी पेटवून आंदोलन केले होते. तो लढवय्या कार्यकर्ता आहे. त्याला सर्वोतोपरी कायदेशीर मदत आम्ही करू, मराठा समाजाला आतंकवादाच्या चौकटीत दाखवण्याचा प्रयत्न चुकीचा आहे, वकील गुणरत्न सदावर्ते हे मराठा समाजाबद्दल चुकीची वक्तव्य करत असतात, असा आरोप करत विनोद पाटील यांनी केला आहे. तर मंगेश साबळे यांच्या पाठीशी आम्ही खंबीर पणे उभे राहू, असं विनोद पाटील म्हणाले.