Maratha Reservation |संघर्ष अटळ आहे ! 16 जूनला मराठा क्रांती मोर्चाची चलो कोल्हापूरची हाक
संभाजीराजे यांनी शिवराज्याभिषेक दिनाला रायगडावरुन मराठा मोर्चा काढण्याची घोषणा केली होती. कोल्हापुरात 16 जूनला हा मोर्चा निघेल, असे त्यांनी सांगितले होते.
संभाजीराजे यांनी शिवराज्याभिषेक दिनाला रायगडावरुन मराठा मोर्चा काढण्याची घोषणा केली होती. कोल्हापुरात 16 जूनला हा मोर्चा निघेल, असे त्यांनी सांगितले होते. मात्र, आता संभाजीराजे पुण्यातून लाँग मार्च काढण्याचा विचार करत आहेत. त्यामुळे 16 जून रोजीच्या कोल्हापुरातील मोर्चावर अनिश्चिततेचे सावट आहे. काही दिवसांपूर्वी संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा आरक्षणासाठी राज्यातील प्रमुख नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या होत्या. मात्र, त्यामधून फार काही हाती लागले नव्हते. त्यामुळे आता संभाजीराजे आणि उदयनराजे भोसले एकत्र येण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी संभाजीराजे छत्रपती आणि खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांच्यात शुक्रवारी नियोजित असलेली बैठक आता लांबणीवर पडली होती.
Latest Videos