अरबी समुद्रातील शिवस्मारकावरून शिंदे-फडणवीस सरकारला अल्टिमेटम; 'तीन महिन्यात सुरू करा, अन्यथा...'

अरबी समुद्रातील शिवस्मारकावरून शिंदे-फडणवीस सरकारला अल्टिमेटम; ‘तीन महिन्यात सुरू करा, अन्यथा…’

| Updated on: May 10, 2023 | 10:27 AM

VIDEO | अरबी समुद्रातील शिवस्मारकाचं काम तीन महिन्यात सुरू करा, अन्यथा...; शिंदे-फडणवीस सरकारला कुणी दिला अल्टिमेटम?

संभाजीनगर : अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवस्मारकाचं काम अद्याप सुरू झालेलं नाही. हे काम तीन महिन्यांच्या आत सुरू करा, असं थेट अल्टिमेटम राज्य सरकारला देण्यात आले आहे. शिंदे फडणवीस सरकारला हे अल्टिमेटम मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक विनोद पाटील यांनी दिलेले आहे. अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवस्मारक व्हावं अशी सर्व शिवभक्तांची इच्छा होती आणि त्याचं भूमिपूजन देखील झालं. मात्र हे काम न्यायप्रविष्ठ असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, अरबी समुद्रातील शिवस्मारकावरून विनोद पाटील यांनी राज्य सरकारला अल्टिमेटम देत शिवस्मरकाचे काम तीन महिन्यात सुरू करा, असा इशाराच दिला आहे. शिवस्मारकाचे काम सुरू करण्यास राज्य सरकार असमर्थ असल्यास आम्हाला एनओसी देण्याची मागणीही विनोद पाटील यांनी केली आहे. तीन महिन्यात हे शिवस्मारकाचे काम सुरू नाही झाल्यास स्वबळावर काम सुरू, असेही राज्य सरकारला सांगितले आहे. तर स्मारकासाठी लागणारा पैसा राज्यातून जमा करून काम सुरू आणि हजारो कोटी रुपये उपलब्ध करून या शिवस्मारकाचे काम सुरू करण्याचा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

Published on: May 10, 2023 10:27 AM