‘औकातीत राहा, अन्यथा गाढवावरुन धिंड काढू’, गुणरत्न सदावर्ते यांना कुणी दिला थेट इशारा
VIDEO | मनोज जरंगे पाटील यांनी अंतरवली सराटी या गावामध्ये मराठा आरक्षणासंदर्भात मोठी सभा घेतली होती. त्यासभेवर वकील गुणरत्न सदावर्ते यांनी टीका केली होती. या टीकेवरून मराठा क्रांती ठोक मोर्चाचे रमेश केरे यांनी दिलं प्रत्युत्तर, मागच्या वेळेला फक्त काळं फासलं आता...
मुंबई, १६ ऑक्टोबर २०२३ | मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक रमेश केरे यांनी गुणरत्न सदावर्तेंवर टीका करत थेट इशारा दिलाय. मनोज जरंगे पाटील यांनी अंतरवली सराटी या गावामध्ये मराठा आरक्षणासंदर्भात मोठी सभा घेतली होती. त्यासभेवर वकील गुणरत्न सदावर्ते यांनी टीका केली होती. त्यावर आत्ता मराठा क्रांती ठोक मोर्चा आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. गुणरत्न सदावर्ते यांची गाढवावरून धिंड काढू असा थेट इशाराच गुणरत्न सदावर्ते यांना मराठा क्रांती ठोक मोर्चाचे रमेश केरे यांच्याकडून देण्यात आला आहे. मनोज जरांगे यांच्या सभेला मी यात्रेसारखे पाहतो. लोक येतात मौजमजा करून जातात. त्यांची भाषा शिवराळ आहे. त्यांच्या अकलेची कुवत उघडी पडली आहे, अशी टीका गुणरत्न सदावर्ते यांनी केली होती. तसेच शरद पवार, उद्धव ठाकरे यांनी जरांगे पाटील यांना पाठिंबा दिला आहे, असे म्हणत सदावर्ते यांनी हल्लाबोल केला होता.