Dhule : मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत नेत्यांना ‘या’ शहरात नो एन्ट्री, मराठा समाजाचा थेट इशारा
VIDEO | मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाला धुळ्यातील मराठा समाजाने पाठिंबा दिला आहे. 24 ऑक्टोबरपर्यंत आरक्षणाचा निर्णय द्यावा अन्यथा नेत्यांना धुळे शहरात बंदी, मराठा क्रांती मोर्चा ,मराठा क्रांती युवा मोर्चा, मराठा क्रांती महिला मोर्चा यांच्याकडून इशारा
धुळे, २३ ऑक्टोबर २०२३ | मराठा आरक्षण देत नाही म्हणून नेत्यांना धुळे शहरात प्रवेश बंदी करण्यात आलीये. मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाला धुळ्यातील मराठा समाजाने पाठिंबा दिला आहे. 24 ऑक्टोबरपर्यंत आरक्षणाचा निर्णय द्यावा अन्यथा सत्ताधारी मंत्री आणि मोठ्या नेत्यांना धुळे शहर बंदी असणार आहे. असा इशारा मराठा क्रांती युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष निलेश काटे यांनी दिला आहे. मराठा क्रांती मोर्चा ,मराठा क्रांती युवा मोर्चा, मराठा क्रांती महिला मोर्चा यांच्याकडून पत्रक काढून हा इशारा देण्यात आला आहे. जालन्यातील आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर त्यांनी राज्यभर दौरा सुरू केला आहे. त्यानंतर आता विविध ठिकाणी सत्ताधारी मंत्री आणि नेत्यांना गावबंदी करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर आता सरकारला 24 तारखेचा शेवटचा इशारा देण्यात आला असून मराठा आरक्षणाचा मुद्दा निकाली निघाला नसल्याने आता धुळे शहरात मंत्र्यांना शहर बंदीचा इशारा दिलाय.