'मराठा नेते काय करताय? मी एकटा पडलो तरी ठासून सांगतोय...', जरांगे पाटील नेमकं काय म्हणाले?

‘मराठा नेते काय करताय? मी एकटा पडलो तरी ठासून सांगतोय…’, जरांगे पाटील नेमकं काय म्हणाले?

| Updated on: Jun 25, 2024 | 4:32 PM

मराठ्यांचे राज्य आहे आणि मग मराठ्यांवर अन्याय का…? मी एकटा पडलो नाही. मला आता मराठ्यांचे नेते फोन करत आहेत. ओबीसींचे नेते सर्व एक झाले आहेत. मग मराठे का एकत्र येत नाहीत म्हणून मी एकटा पडलो आहे असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. ओबीसी नेते एक झालेत, मराठा नेते काय करताय? असा सवाल मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे

ओबीसी नेते एक झालेत, मराठा नेते काय करताय? असा सवाल मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. एकटा पडलोय तरी मी लढणार… ठासून सांगतोय.. असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. ‘मला खूप बोलले आहेत. जे आजू-बाजूला गेलेत त्यांनाही माहिती आहे. मला किती घाण बोलले आहेत. पण मी जातीसाठी पचवतोय. माझा म्हणण्याचा अर्थ एकच आहे की, ओबीसी नेते एक झालेत. मी एकटा पडलोय… मराठ्यांचे नेते काय करताय?’, असे म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी मराठा नेत्यांनाच थेट अप्रत्यक्षपणे सवाल केलाय. पुढे मनोज जरांगे पाटील असेही म्हणाले, मी एकटा जरी राहिलो तरी लढणार…हे ठासून सांगतोय, असं मनोज जरांगे पाटील यांनी सांगत असताना १३ जुलै रोजी धमाका होणार असल्याचा इशाराही मनोज जरांगे पाटील यांनी दिला.

Published on: Jun 25, 2024 04:32 PM