Manoj Jarange Patil यांचं नवव्या दिवशीही उपोषण सुरूच, प्रकृती खालावली अन्
VIDEO | मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षण मिळावे यासाठी आपले प्राण प्रणाला लावले, तरीही सलग नवव्या दिवशी उपोषण सुरूच मात्र मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावल्याने आंदोलनस्थळी लावली सलाईन
जालना, ६ सप्टेंबर २०२३ | जालन्यातील आंतरवाली सराटी येथे मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसले आहे. आज त्यांच्या आंदोलनाचा नववा दिवस असूनही त्यांचं उपोषण सुरूच आहे. सरकारने मनोज जरांगे पाटील यांची उपोषण मागे घ्यावे म्हणून मनधरणी केली मात्र मनोज जरांगे पाटील हे आपल्या मागण्यावर ठाम आहेत. दरम्यान, आज सलग नवव्या दिवशी मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सुरू असल्याने त्यांची प्रकृती खालवल्याचे समोर आले आहे. त्यांना अस्वस्थ वाटू लागलं आहे. त्यामुळे उपोषण स्थळीच जरांगे पाटील यांना सलाईन लावण्यात आली आहे. आज पहाटेच त्यांना सलाईन लावली आहे. मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालवल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांना अस्वस्थ वाटू लागले आहे.
Published on: Sep 06, 2023 11:01 AM
Latest Videos