आरक्षणावरून नवं ‘राज’कारण, राज ठाकरेंच्या ‘त्या’ विधानावर मराठा आंदोलक आक्रमक, काय केली मागणी?
धाराशिवमध्ये राज ठाकरे यांच्या भेटीसाठी मराठा आंदोलक आले होते. मात्र त्यांची भेट नाकारली. आर्थिक निकषावर आरक्षणाचा आग्रह करणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आता नवी भूमिका घेत राज्यात आरक्षणाची गरज नसल्याचे म्हटलं आहे. यावरून वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी राज ठाकरेंची थेट अटकेची मागणी केली आहे.
धाराशिवमध्ये राज ठाकरे यांच्या भेटीसाठी मराठा आंदोलक आले होते. मात्र यावेळी राज ठाकरे यांनी भेट नाकारल्याने मराठा आंदोलक हे आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले होते. यानंतर राज ठाकरेंनी आंदोलकांना भेटीसाठी बोलावलं. दरम्यान, मराठा आंदोलक भेट नाकारल्यानंतर राज ठाकरेंच्या भेटीसाठी हॉटेल पुष्पक पार्कमध्ये घुसले आणि आरक्षणासंदर्भात केलेल्या वक्तव्यावर त्यांनी माफी मागावी अशी मागणी देखील आंदोलकांनी केली. यापूर्वी आर्थिक निकषावर आरक्षणाचा आग्रह करणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आता नवी भूमिका घेत राज्यात आरक्षणाची गरज नसल्याचे म्हटलं आहे. यावरून वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी राज ठाकरेंची थेट अटकेची मागणी केली आहे. तर जरांगे पाटील यांच्या मते, भाजपच विविध मार्गाने मराठा आरक्षणाचा वाद भडकवतंय. बघा या संदर्भातील स्पेशल रिपोर्ट…
Published on: Aug 06, 2024 10:39 AM
Latest Videos