मराठा समाज हा देशात OBC ! काय आले धक्कादायक पुरावे समोर? Watch Video
VIDEO | संपूर्ण देशामध्ये मराठा समाज हा कुणबी असल्याचा काही नोदींचा अहवाल आला समोर, मराठा आरक्षण अभ्यासक Rajendra Date यांनी कोणते दाखवले पुरावे? मराठा आरक्षणासंदर्भातील या नोंदी दाखवताना काय केला दावा?
छत्रपती संभाजीनगर, ४ सप्टेंबर २०२३ | गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. तर आता जालन्यात मराठा अदोलनावर झालेल्या लाठीचार्जनंतर मराठा समाज आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. जालन्यात मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन गेल्या सात दिवसांपासून सुरू आहे. या आंदोलनाला आता राज्यभरातून पाठिंबा मिळताना दिसत असून एक मोठी माहिती मराठा आरक्षणासंदर्भातील समोर आली आहे. ती म्हणजे मराठा समाज हा संपूर्ण देशात ओबीसी असल्याचे धक्कादायक पुरावे मराठा आरक्षणाचे अभ्यासक राजेंद्र दाते पाटील यांनी tv9 च्या कॅमेऱ्यासमोर मांडले आहेत. इतकेच नाही तर हैदराबाद स्टेट, मुंबई स्टेट आणि कर्नाटक स्टेटचेही मराठवाड्यातील अस्सल डॉक्युमेंट समोर आणले आहेत, ज्या आधारे मराठा समाज हा ओबीसी असल्याचा दावा राजेंद्र दाते पाटील यांनी केला.