मुंबईत उपोषण होणार की नाही? मनोज जरांगे पाटलांविरोधात हायकोर्टात याचिका, काय म्हटलंय याचिकेत?

मुंबईत उपोषण होणार की नाही? मनोज जरांगे पाटलांविरोधात हायकोर्टात याचिका, काय म्हटलंय याचिकेत?

| Updated on: Jan 09, 2024 | 11:12 AM

येत्या २० जानेवारीपासून मनोज जरांगे पाटील यांनी बेमुदत आंदोलनाची घोषणा केली आहे. यासाठी जालना अंतरवाली सराटी येथून ते लाखो आंदोलकांसह मुंबईकडे रवाना होणार आहे. मात्र मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर अजित पवार यांनी थेट भाष्य करत टोकाचा इशाराही दिलाय

मुंबई, ९ जानेवारी २०२४ : मनोज जरांगे पाटील यांच्या २० जानेवारी रोजी होणाऱ्या उपोषणावरून मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. मनोज जरांगे पाटील मुंबईला वेठीस धरणार असून त्यांना उपोषणाला परवानगी देऊ नये, असं याचिकाकर्ते हेमंत पाटील यांनी म्हटलं आहे. याचिकाकर्ते हेमंत पाटील यांनी ही याचिका दाखल केली आहे. ते म्हणाले, ‘मनोज जरांगे यांनी जेव्हा जेव्हा आंदोलन केली तेव्हा सरकारने त्यांच ऐकलं. मात्र आता मनोज जरांगे पाटील हे मुंबईला वेठीस धरायला निघाले आहे. त्याला आम्ही आक्षेप घेतलाय आणि उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.’ येत्या २० जानेवारीपासून मनोज जरांगे पाटील यांनी बेमुदत आंदोलनाची घोषणा केली आहे. यासाठी जालना अंतरवाली सराटी येथून ते लाखो आंदोलकांसह मुंबईकडे रवाना होणार आहे. मात्र मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर अजित पवार यांनी थेट भाष्य करत टोकाचा इशाराही दिलाय. कायदा हाती घेतला तर मुलाहिजा ठेवणार नाही, असं अजितदादांनी दिलाय. तर छगन भुजबळ यांना अजित पवार यांनी मराठ्यांच्या अंगावर सोडलं, हे स्पष्ट झाल्याचं जरांगेंनी म्हटलंय.

Published on: Jan 09, 2024 11:11 AM