मराठा तरूणांसाठी दिलासा, MPSC पदभरतीत ‘इतक्या’ जागांची वाढ, सुधारित जाहिरात प्रसिद्ध
२०२३ च्या जाहिरातीत २५० जागांची वाढ करून नवी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यामुळे आता मराठा उमेदवारांना मागासवर्गीय सवलतींचा लाभ घेता येणार आहे. कारण एमपीएससीद्वारे घेण्यात येणाऱ्या पदभरतीत मराठा आरक्षण लागू करण्यात आलं आहे. बघा व्हिडीओ....
एमपीएससीद्वारे घेण्यात येणाऱ्या पदभरतीत मराठा आरक्षण लागू करण्यात आलं आहे. २०२३ च्या जाहिरातीत २५० जागांची वाढ करून नवी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यामुळे आता मराठा उमेदवारांना मागासवर्गीय सवलतींचा लाभ घेता येणार आहे. यासह ज्या उमेदवारांनी वयोमर्यादा ओलांडली आहे अशांना देखील नव्याने अर्ज करता येणार आहे. लोकसभा निवडणूक आणि मराठा समाजाच्या आंदोलनची दखल घेत राज्य शासनाने फेब्रुवारी २०२४ मध्ये मराठा आरक्षणाचा कायदा केला. मात्र आरक्षण लागू होण्यापूर्वी एमपीएससीच्या अनेक जाहिराती प्रसिद्ध झाल्या आहेत. तर विविध विभागांच्या परीक्षा प्रलंबित आहेत. आता या सर्व जाहिरातींमध्ये एसईबीसी आरक्षण लागू करून शुद्धिपत्रक काढण्यात येणार आहे. एसईबीसी म्हणजेच मराठा आरक्षण लागू करण्यात आले आहे. त्याशिवाय या आरक्षणाच्या लाभार्थींसाठी अनेक सुविधाही जाहीर केल्या आहेत.