Manoj Jarange Patil यांचं शिष्टमंडळ सरकारच्या भेटीसाठी आज मुंबईत, काय होणार चर्चा?
VIDEO | मनोज जरांगे पाटील यांचे शिष्टमंडळ शिंदे सरकारच्या भेटीसाठी मुंबईत येणार आहे. सरसकट मराठा कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी जरांगे पाटील यांचे १६ ते १७ लोकांचा समावेश असणारं शिष्टमंडळ ही भेट घेणार आहे.
मुंबई, ८ सप्टेंबर २०२३ | ‘मराठा समाजातील ज्यांच्याकडे कुणबी असल्याच्या नोंदी असतील अशा व्यक्तीला कुणबी जात प्रमाणपत्र मिळतील’, असा निर्णय राज्य सरकारने दिला. मनोज जरांगे पाटील यांच्या काही मागण्यांपैकी हा एक महत्त्वाचा निर्णय सरकारने घेतला. तर न्याय दिला नाही म्हणत मराठा समाजाला सरसकट कुणबी जातप्रमाणपत्र देण्यात यावे, ही आमची मूळ मागणी असल्याने मनोज जरांगे यांनी आपले आंदोलन सुरूच ठेवले. दरम्यान आज जरांगे पाटील यांचे शिष्टमंडळ शिंदे सरकारच्या भेटीसाठी मुंबईत येणार आहे. सरसकट मराठा कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी जरांगे पाटील यांचे शिष्टमंडळ ही भेट घेणार आहेत. या शिष्टमंडळामध्ये १६ ते १७ लोकांचा समावेश असणार आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासंदर्भात केलेल्या मागणीचा विचार करुन शिंदे-फडणवीस सरकारकडून अधिकृत जीआर जारी करण्यात आलाय मात्र त्यात सुधारणा हव्यात म्हणून आजची भेट शिष्टमंडळ घेणार आहे.