BIG BREAKING : मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती बिघडली, तातडीने रुग्णालयात; नेमकं काय झालं?
लातूरमधील माकणी आणि मुरुड तसेच बीड जिल्ह्यातील अंबेजोगाई येथे मनोज जरांगे पाटील यांच्या सभा पार पडल्या. यावेळी त्यांची तब्येत खालावल्याने त्यांनी बसून भाषण केले. आज जरांगे पाटील यांची तब्येत अधिक खालावल्याचे पाहायला मिळाले.
बीड, ११ डिसेंबर २०२३ : मनोज जरांगे पाटील यांचा राज्यभरात मराठा संवाद दौरा सुरू आहे. या दौऱ्यादरम्यान आज धाराशिव येथे सभा सुरू असताना अचानक त्यांची तब्येत खालावल्याचे समोर आले. धाराशिव जिल्ह्यातील लोहारा येथील माकणी आणि मुरुड तसेच बीड जिल्ह्यातील अंबेजोगाई येथे आज जाहीर सभा होती. मात्र ही जाहीर सभा सुरू असताना जरांगे पाटील यांची तब्येत खालावल्याने त्यांनी बसून भाषण केले. आज जरांगे पाटील यांची तब्येत अधिक खालावल्याने थोरात हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे आणि डॉक्टरानी त्यांना नितांत आराम आणि उपचाराची गरज असल्याचे प्राथमिक तपासणी करून सांगितले. जरांगे पाटील यांच्यावर उपचार करणारे संदीप थोरात यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी जरांगेंना विश्रांतीची गरज असल्याचे म्हटले.
Published on: Dec 11, 2023 09:42 PM
Latest Videos