जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, उपचार अन् पाणी पिण्यास नकार; महिला-ग्रामस्थांना अश्रू अनावर

जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, उपचार अन् पाणी पिण्यास नकार; महिला-ग्रामस्थांना अश्रू अनावर

| Updated on: Sep 24, 2024 | 3:27 PM

जरांगे पाटील यांची अंतरवाली सराटीत तब्येत खालावल्याने महिलांसह आबालवृद्धामध्ये चिंता निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहेत. जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेण्यासाठी महिलांनी त्यांना विनंती केली. यावेळी त्यांनी एकच आक्रोश केला. महिला भावूक होऊन त्यांना आपले अश्रू अनावर झाल्याचे पाहायला मिळाले

मनोज जरांगे पाटील यांनी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचं औचित्य साधत 16 सप्टेंबरपासून उपोषणाचे हत्यार उपसलं आहे. मनोज जरांगे पाटील यांचं जालन्यातील अंतरवाली सराटी येथे सगेसोयऱ्याची अंमलबजावणी आणि ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण मिळावं या प्रमुख मागणीसाठी आमरण उपोषण सुरू आहे. आज मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आठवा दिवस आहे. आज पुन्हा मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली असल्याचे पाहायला मिळत आहे. काल मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणस्थळी छत्रपती संभाजी राजे दाखल होत त्यांनी त्यांची भेट घेतली होती. यावेळी त्यांनी आपली भूमिका देखील मांडली होती. मात्र आज उपोषणाच्या आठव्या दिवशी मनोज जरांगे पाटील त्यांची प्रकृती चांगलीच खालवल्याने ग्रामस्थ आणि नागरिकांमध्ये चलबिचल सुरू झाली आहे. महिलांनी देखील मनोज जरांगे पाटील यांना पाणी पिण्यासाठी विनवण्या केल्या मात्र मनोज जरांगे यांनी महिलांना देखील नकार दिला आणि महिलांना देखील अश्रू अनावर झालेत. महिलांनी त्यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली. पण जरांगे पाटील त्यांच्या मागणीवर ठाम आहेत.

Published on: Sep 24, 2024 03:21 PM