Manoj Jarange Patil मराठ्यांचे नवे नेते? मराठा आरक्षणासाठी एल्गार पुकारलेल्या कार्यकर्त्याचं जंगी स्वागत
tv9 marathi Special Report | मराठा आरक्षणासाठी एल्गार पुकारलेल्या सामाजिक कार्यकर्ता मनोज जरांगे पाटील यांची राज्यभरात संवाद यात्रा होतेय. संवाद यात्रेत जरांगे पाटील यांना तुफान प्रतिसाद मिळतोय तर कुठं मराठा बांधवांकडून जरांगेंचं शानदार स्वागत होताना दिसतंय, बघा स्पेशल रिपोर्ट
मुंबई, ३ ऑक्टोबर २०२३ | मराठा आरक्षणासाठी 40 दिवसांची मुदत दिल्यानंतर आता मनोज जरांगे पाटील यांनी संवाद यात्रा सुरु केली आणि या संवाद यात्रेत जरांगे पाटलांना तुफान प्रतिसाद मिळतोय. त्यामुळं जरांगे पाटील मराठा समाजाचे नवे नेते होत आहेत का? अशी चर्चा सुरु झाली आहे. गाड्यांचा ताफा, जेसीबीनं भव्य हार आणि समर्थकांची गर्दी. हा लवाजमा कुठल्या नेत्याचा नाही, तर मराठा आरक्षणासाठी एल्गार पुकारलेल्या जरांगे पाटलांचा आहे. परभणीत मराठा बांधवांकडून जरांगेंचं शानदार स्वागत झालं. त्यामुळं जरांगे पाटील मराठ्यांचे नवे नेते आहेत का ? अशी चर्चा सुरु झालीय. लोकशाहीत कोणालाही नेता होता येतं, अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी दिलीय. मात्र जरांगे पाटलांनी यात्रा मराठा आरक्षणासाठी काढलीय आणि प्रचंड प्रतिसादही मिळतोय.
गेल्या काही दिवसांत पंकजा मुंडेंचं शिवशक्ती यात्रेदरम्यान भव्य स्वागत झालं. फुलांची उधळण झाली. जेसीबीनं हार घातले गेले. उपमुख्यमंत्री अजित पवारांनाही जेसीबीनं हार घालण्यात आले. धनंजय मुंडेंचही याच पद्धतीनं स्वागत झालं आणि शरद पवारांसाठीही त्यांच्या कार्यकर्त्यानं हार घालण्यासाठी जेसीबी आणला. सध्या हे एखाद्या नेत्यासाठी कॉमन गोष्ट आहे. मात्र, महाराष्ट्र दौऱ्यावर मराठा समाजाला भेटण्यासाठी निघालेल्या जरांगे पाटलांनाही तसाच प्रतिसाद मिळतोय. बघा या संदर्भातील स्पेशल रिपोर्ट