‘तो काय माणूस आहे का? तो कसला दिलबऱ्या…भुजबळ तर…’, एकेरी उल्लेख करत जरांगेंचा निशाणा
दिलबर के लिए दिलदार, दुष्मन के लिए तलवार है हम, छगन भुजबळ यांनी अशी शायरी केल्याचे पाहायला मिळाले. पुण्यात मंगेश ससाणे यांच्या उपोषणस्थळी दाखल झाल्यानंतर छगन भुजबळ यांनी ही शायरी केली. यावर बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले, 'ज्यांनी तुला बोटाला धरून मोठं केलं त्यांना तू अटक केलं. कोणासाठी दिलबर राहिला'
मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मंत्री छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधल्याचे पाहायला मिळाले. पुण्यातील मंगेश ससाणे यांच्या उपोषणस्थळी छगन भुजबळ यांनी एक शायरी करत इशारा दिला होता. यावर मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दिलबर के लिए दिलदार, दुष्मन के लिए तलवार है हम, छगन भुजबळ यांनी अशी शायरी केल्याचे पाहायला मिळाले. पुण्यात मंगेश ससाणे यांच्या उपोषणस्थळी दाखल झाल्यानंतर छगन भुजबळ यांनी ही शायरी केली. यावर बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले, ‘ज्यांनी तुला बोटाला धरून मोठं केलं त्यांना तू अटक केलं. कोणासाठी दिलबर राहिला. मोठं करणाऱ्याचे तरी उपकार ठेवले पाहिजे त्यालाही विसरला. ज्याने तुझ्यासाठी १६ टक्के आरक्षण दिलं. त्याचंही वाटोळं केलं. भाजपचे सीटं पाडले. मराठ्यांचं वाटोळं केलं. भुजबळ दिलबऱ्या नाही तर गोंधळ्या’, असा एकेरी उल्लेख करत मनोज जरांगे पाटील यांनी भुजबळांवर हल्लाबोल केलाय.