Manoj Jarange कुणी नेता किंवा कुणी अभिनेताही नाही, तरीही होतंय जागोजागी जंगी स्वागत

Manoj Jarange कुणी नेता किंवा कुणी अभिनेताही नाही, तरीही होतंय जागोजागी जंगी स्वागत

| Updated on: Oct 09, 2023 | 11:25 AM

tv9 Special Report | ओबीसीतून आरक्षण द्यावं या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यात आंतरवाली सराटीत सलग 17 दिवस आमरण उपोषण केलं. या सर्वसामान्य माणसांचं मनोज जरांगे पाटील यांचं राज्यात जागोजागी होतंय जंगी स्वागत, याचा फायदा कुणाला, कुणाचा तोटा?

मुंबई, ९ ऑक्टोबर २०२३ | मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र देत ओबीसीतून आरक्षण द्यावं या मागणीसाठी जरांगे यांनी आंतरवाली सराटीत 17 दिवस उपोषण केलं. याच जरांगेंचा मराठवाडा दौरा चांगलाच गाजतांना दिसतोय. मराठवाडा आणि आसपासच्या जिल्ह्यात जरांगे यांचं जंगी स्वागत केलं जातंय. जरांगे हा कुणी नेता नाही. किंवा कुणी अभिनेताही नाही. हा तुमच्या आमच्यासारखाच एक सर्वसामान्य माणूस आहे. पण मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी या माणसाने उपोषणाचं हत्यार उपसलं आणि सरकारच्या नाकीनऊ आणलं. त्या मनोज जरांगे पाटलांचं आज मराठवाडा आणि आसपासच्या जिल्ह्यात असं जंगी स्वागत केलं जातंय. हजारोंच्या संख्येनं एकत्र मराठा समाजबांधव जरांगे यांचं स्वागत करत आहेत. जरांगे पाटलांवर जेसीबीतून फुलांची उधळण केली जातेय. कार्यकर्त्यांकडून मोठाले हार घालत जरांगेंचं स्वागत होत आहे. महत्वाचं म्हणजे आता जरांगे पाटील यांच्या दौऱ्यात विविध राजकीय पक्षाचे नेतेही सहभागी होत आहेत. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट

Published on: Oct 09, 2023 11:25 AM