हम झुका सकते है, असं म्हणत जरांगे पाटील सरकारला धमक्या देतात; कुणाचा हल्लाबोल

हम झुका सकते है, असं म्हणत जरांगे पाटील सरकारला धमक्या देतात; कुणाचा हल्लाबोल

| Updated on: Nov 10, 2023 | 3:23 PM

हम झुका सकते है, असा गर्व मनोज जरांगे पाटील यांना झाला असल्याचा हल्लाबोल राज्याचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी केलाय. इतकंच नाहीतर जरांगे पाटील हे राज्य सरकारला धमक्या देत असल्याचा आरोपही वडेट्टीवार यांनी केला आहे. राजकीय फायद्यासाठी जरांगे पाटील बोलताय अशी टीकाही विजय वडेट्टीवार यांनी केली

मुंबई, १० नोव्हेंबर २०२३ | हम झुका सकते है, असा गर्व मनोज जरांगे पाटील यांना झाला असल्याचा हल्लाबोल राज्याचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. इतकंच नाहीतर जरांगे पाटील हे राज्य सरकारला धमक्या देत असल्याचा आरोपही विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. राजकीय फायद्यासाठी मनोज जरांगे पाटील हे बोलत आहेत अशी टीकाही विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. ओबीसीतील ३७२ जातीत येऊन मराठ्यांना कोणताच फायदा मिळणार नाही. ओपनमध्ये फार कोणत्या जाती राहणार नाही. नोकऱ्या, सोयी सुविधांचा विषय ज्या ठिकाणी येतो. तिथे फार मोठं नुकसान मराठ्यांचं होणार आहे, असे विजय वडेट्टीवार म्हणाले. तर मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून जो काही गोळीबार झाला. त्यानंतर मराठा समाजाचे जरांगे नायक म्हणून पुढे आलेत. हम झुका सकते है, असा गर्व मनोज जरांगे पाटील यांना झाला आणि ते सरकारला धमक्या देऊ लाागल्याचेही वडेट्टीवार म्हणाले.

Published on: Nov 10, 2023 03:23 PM