आता मनोज जरांगेंच्या दबावाला बळी पडू नका, अन्यथा…, आपल्याच सरकारला कुणी दिला इशारा?
आता मनोज जरांगे पाटील यांच्या दबावाला बळी पडून ओबीसीतून मराठा आरक्षण देऊ नये, असे स्पष्ट म्हणत भाजपच्या ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष डॅा. अशोक जीवतोडे यांनी आपल्याच सरकारला इशारा दिला आहे. जर मराठ्यांना आता ओबीसीतून आरक्षण दिल्यास विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रात ओबीसी आंदोलन पुन्हा पेटेल...
ओबीसी नेते लक्षण हाके यांच्या उपोषणाला भाजपच्या ओबीसी आघाडीचा पाठिंबा असल्याचे भाजप ओबीसी आघाडीचे उपाध्यक्ष डॉ. अशोक जीवतोडे यांनी सांगितले आहे. सरकारने हाके यांच्या उपोषणाची दखल घेतली नसल्याचे सांगत विदर्भातही ओबीसी आंदोलन सुरु होणार असल्याची डॉ. अशोक जीवतोडे यांनी माहिती दिली. राज्य सरकारने ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण दिलं आहे. पण आता मनोज जरांगे पाटील यांच्या दबावाला बळी पडून ओबीसीतून मराठा आरक्षण देऊ नये, असे स्पष्ट म्हणत भाजपच्या ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष डॅा. अशोक जीवतोडे यांनी आपल्याच सरकारला इशारा दिला आहे. जर मराठ्यांना आता ओबीसीतून आरक्षण दिल्यास विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रात ओबीसी आंदोलन पुन्हा पेटेल असा इशाराही सरकारला दिला. राज्य सरकारने ओबीसी समाजाच्या हिताचे अनेक निर्णय घेतले, आरक्षण जाणार नाही हे लेखी दिली. त्यामुळे जरांगे पाटील यांच्या दबावाला बळी पडू नये, असे त्यांनी म्हटलं आहे.