मराठा समाजाला आरक्षण याचिका फेटाळल्यावर मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, आम्ही काम करत आहोत

| Updated on: Apr 21, 2023 | 7:32 AM

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आमचे सरकार पूर्णपणे कटिबद्ध आहे. त्यासाठी लागेल ते करू. भोसले समितीने दिलेल्या सूचनांवर आम्ही काम करत आहोत

मुंबई : मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल करण्यात आलेली होती. ही याचिका न्यायालयाने फेटाळली असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. राज्य शासनातर्फे जून 2021 मध्ये मराठा आरक्षण पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आलेली होती. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आमचे सरकार पूर्णपणे कटिबद्ध आहे. त्यासाठी लागेल ते करू. भोसले समितीने दिलेल्या सूचनांवर आम्ही काम करत आहोत. तर यावेळी त्यांनी तत्कालिन ठाकरे सरकारला जबाबदार धरत न्या. भोसले कमिटीनं फेरविचार याचिकेमध्ये कोणताही स्कोप नसल्याचं म्हटलं होतं असे म्हटलं आहे. तरी देखील ठाकरे सरकारने याचिका का दाखल केली होती?, असा सवाल करत मुख्यमंत्र्यांनी मविआवर निशाणा साधला आहे.

Published on: Apr 21, 2023 07:32 AM
किशोरी पेडणेकरांना हायकोर्टाचा दिलासा; मुंबई पोलिसांना दिले ‘हे’ निर्देश
शिवसेना फुटीनंतर रविवारी जळगावात उद्धव ठाकरे यांची पहिलीच सभा; ‘घुसून दाखवा’ म्हणत कुणी दिला इशारा?